जगातील पहिले अंडरवॉटर हॉटेल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हे ठिकाण इतके सुंदर आहे की अभिनेत्री काजल अग्रवालसह अनेक सिने कलाकारांनी येथे आपला हनिमून साजरा केला आहे. त्याचे भाडे इतके महाग आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ‘द मुराका’ नावाचे हे हॉटेल 2018 मध्ये मालदीवमध्ये उघडण्यात आले होते. समुद्रसपाटीपासून सुमारे 16 फूट खाली बांधलेल्या या व्हिलाची किंमत 15 दशलक्ष डॉलर्स होती. येथे राहण्याचा खर्चही अवाक करणारा आहे. इथे एका रात्रीच्या मुक्कामाची सोय नसून पूर्ण पॅकेज घ्यावे लागेल. चार रात्रीचे पॅकेज 2 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 1.5 कोटी रुपये आहे. त्यानुसार एका रात्रीचे भाडे सुमारे 37 लाख रुपये इतके आहे.
या व्हिलाचे वैशिष्ट्या म्हणजे खोलीच्या आतून समुद्रापर्यंत सर्व काही स्पष्टपणे पाहता येते. म्हणजे 180 डिग्रीमध्ये सागरी जीवन दृश्याची मजा लुटता येते. इच्छुक पाहुण्यांना सुरुवातीला मुख्य रिसॉर्टमध्ये पोहोचावे लागते. तेथून पाहुणे खासगी सी प्लेन, जेट किंवा स्पीड बोटच्या मदतीने हॉटेलमध्ये पोहोचतात. हा 2 मजली व्हिला स्टील, काँक्रीट आणि अॅव्रेलिकचा बनलेला आहे. यात 2 बेडरूम, एक जिम आणि एक बाथरूम आहे. मेकअप रुम, किचन, बार आणि डायनिंग एरियाही स्वतंत्रपणे बांधण्यात आला आहे. यातील अंतर्गत रचना थक्क करणारी आहे.