नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) शुक्रवारी अँड्रॉईड मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले. या ऍपमध्ये युपीएससी परीक्षा आणि भरतीशी संबंधित माहिती दिली जाणार असल्याचे अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे ऍप अँड्रॉईड फोनसाठी असून ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह सध्या अभ्यासक्रम शिकणाऱया विद्यार्थ्यांना हे ऍप मार्गदर्शक ठरणार असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. सध्या युपीएससी परीक्षार्थी ऑनलाईन माध्यमांचा अधिकाधिक वापर करत असल्यामुळे मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या या ऍपचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी घेतील, अशी अपेक्षा आहे.