बेळगाव : गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर-बेळगावची 114 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 25 रोजी सिटी हॉल, भाग्यनगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष सुनील नाईक, कार्यवाह राघव हेरेकर, खजिनदार विकास कब्बे आणि ज्ये÷ विश्वस्त दिलीप नाईक उपस्थित होते. प्रारंभी गेल्या वर्षभरातील दिवंगत समाजबांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राघव हेरेकर यांनी गतवषीच्या अहवालाचे वाचन केले. त्याला सभेने मंजुरी दिली. खजिनदार विकास कब्बे यांनी सभेपुढे मागील वर्षाचा हिशेब आणि आगामी वर्षाचे अंदाजपत्रक मांडले, त्याला मंजुरी देण्यात आली. सुनील नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना काळात समाजाचे सामाजिक कार्य कसे सुरू होते, याचे विवेचन
केले.
विद्यमान कार्यकारिणीची मुदत यंदा संपत असल्याने नव्या कार्यकारिणीची निवडणूक घेणे आवश्यक होते. त्यासाठी दिलीप नाईक यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कार्यकारिणीच्या 26 जागांसाठी 28 अर्ज आले होते. पण दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे दिलीप नाईक यांनी यावेळी जाहीर केले.
यशश्री देशपांडे, ज्ञानेश गिंडे, राघव हेरेकर, प्रदोष हेगडे, शुभा गिंडे, विलास हवालदार, विकास कब्बे, संदीप कोलवालकर, शांताराम कर्नाटकी, सुनील नाईक, विनोद प्रभू, भास्कर फातरफोड, संजय नाईक, विनिता नाईक, सुभाष परब, श्रीकांत प्रभू, संध्या सडेकर, वेंकटेश शानभाग, गिरीश सराफ, गणेश सराफ, सतीश शानभाग, दिलीप तिळवे, अजित तिळवे, गजानन वेलंगी, आनंद वेलंगी आणि अपर्णा वेलंगी यांची कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी दिलीप नाईक यांनी जाहीर केले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, समाजाचे विश्वस्त बालमुकुंद पतकी, उपाध्यक्ष यशश्री देशपांडे आणि आनंद वेलंगी, उपकार्यवाह संदीप कोलवालकर, कार्यकारिणी सदस्य, कायम निमंत्रित, सारस्वत महिला मंडळाच्या सदस्या आणि समाजबांधव उपस्थित होते. राघव हेरेकर यांनी प्रास्ताविक, स्वागत, सूत्रसंचालन करून आभार मानले.