ओटवणे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
ओटवणे प्रतिनिधी
मुंबईत राहूनही ओटवणे ग्रामस्थांचे मुंबई मंडळ आपल्या गावाच्या प्रेमापोटी ओटवणे गावाच्या शैक्षणिक धार्मिक व सामाजिक कार्यात देत असलेले योगदान कौतुकास्पद असून मंडळाची ही सामाजिक बांधिलकी कोकणातील चाकरमान्यांच्या मुंबई मंडळांसाठी आदर्शवत आहे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर यांनी केले.
ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या ओटवणे गावातील वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात वामन कविटकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, मुंबई मंडळाचे माजी खजिनदार दशरथ गावकर, सदस्य राजन नाईक, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सदस्य मनोहर मयेकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, सगुण गावकर श्री पंधारे, यशवंती काटाळे,
एकनाथ धोंगडे, संजिवनी गवस, एन व्ही राऊळ, पी एम कांबळे, शंकर बिरोडकर, मंगेश गावकर, महादेव खेडेकर, मधुकर खरवत, शरद जाधव, आदी उपस्थित होते.यावेळी ओटवणे हायस्कूलमधुन दहावी परीक्षेत मार्च २०२३ मध्ये प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या कु. करिश्मा मिलिंद राणे, कु. रेश्मा चंद्रकांत नाईक, कु. सानिका विश्वनाथ भिसे यांच्यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आत्माराम गावकर, राजाराम वर्णेकर, राजेंद्र देसाई यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या. तर मुंबई मंडळाचे दशरथ गावकर आणि राजन नाईक यांनी मंडळाच्यावतीने यापुढेही गावात उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर मयेकर, सूत्रसंचालन एकनाथ धोंगडे तर आभार संजिवनी गवस यांनी मानले.