बायोपिकसाठी अभिनेत्रीची विशेष तयारी
स्वतःच्या दमदार अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आता ‘चकदा एक्स्प्रेस’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती दीर्घकाळानंतर चित्रपटसृष्टीत परतणार आहे. अभिनेत्रीने या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे.
अनुष्काने रविवारपासून चित्रिकरणात भाग घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटासाठी ती मैदानात कसून सराव होती. या चित्रपटात ती वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण देशातील अनेक ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम्समध्ये केले जणार आहे. चकदा एक्स्प्रेसचे याचबरोबर इंग्लंडमध्येही चित्रिकरण होणार आहे. अभिनेत्री 30 दिवसांच्या चित्रिकरणासाठी लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामी या भारतीय महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटासाठी अभिनेत्रीने वेगवान गोलंदाजी जाणून घेत वर्कआउट सुरू केला आहे.
अनुष्का यापूर्वी 2018 मध्ये झीरो या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसून आली होती. या चित्रपटात अनुष्काने शाहरुख तसेच कॅटरीना कैफसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अभिनयापासून ब्रेक घेतला हाहेता. परंतु तिच्या प्रॉडक्शन हाउसच्या बॅनर अंतर्गत अनेक चित्रपट तसेच ‘पाताल लोक’ यासारख्या वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली होती.