आयफोन 15 सह, वॉच सीरीज 9 सह अल्ट्रा 2 वॉच देखील सादर करणार
कॅलिफोर्निया
जगातील दिग्गज टेक कंपनी व आयफोन निर्मिती कंपनी अॅपल आपला वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम सादर करणार आहे. 12 सप्टेंबर रोजी आयोजीत होणाऱ्या या आपल्या कार्यक्रमाला अॅपलने ‘वंडरलस्ट’ असे नाव दिले आहे.
हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील अॅपल मुख्यालयातील ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम रात्री 10.30 वाजता सुरु होणार असून याचे थेट ऑनलाईन सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.
या उत्पादनांचे होणार सादरीकरण
अॅपलच्या या कार्यक्रमात आयफोन 15 मालिकेसोबत अॅपल वॉच सीरीज 9 आणि अॅपल वॉच अल्ट्रा 2 सादर करण्याची शक्यता आहे. परंतु या कार्यक्रमात आणखीन नवीन काही उत्पादने सादर करण्यात येणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही.
अन्य नोंदी…
? कंपनी आगामी आयफोन 15 आवृत्तीमध्ये चार्जिंगसाठी टाईप सी पोर्ट देणार
? कंपनी आयओएस 17 च्या रोलआउटची तारीख देखील घोषित करु शकते
? कंपनी दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवीन
आयफोन सादर करते
? 2017 पासून भारतात
आयफोन निर्मितीला प्रारंभ
? अॅपलचे तिन्ही कंत्राटदार उत्पादक फॉक्सकॉन, विस्ट्रॉन व पेगट्रॉन या भारत सरकारच्या 41,000 कोटी रुपयांच्या उत्पादन प्रोत्साहन सवलत योजनेचा भाग आहेत.