वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एसबीआय कार्डच्या माजी कार्यकारी अपर्णा कुप्पुस्वामी यांची भारतपे कंपनीत चिफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे. यासंबंधीची माहिती भारतपे कंपनीने शेअरबाजाराला दिली. अपर्णा यांनी एसबीआय कार्डमध्ये जवळपास 14 वर्षे सेवा बजावली असून त्यांच्या अनुभवाकडे पाहूनच भारतपे यांनी त्यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जाते. सीएफओ व अंतरिम सीईओ नलिन नेगी यांच्यासोबत त्या आपली जबाबदारी निभावतील.