मालवण –
केंद्र शासन आयोजित इंडियन स्वच्छता लीग २.० या स्पर्धेत मालवण शहर सहभागी झाले आहे. स्पर्धेत मालवण शहराच्या मालवण नेव्हिगेटर्स या संघाच्या संघनायकपदी ले. प्रा. डॉ. एम. आर. खोत यांची निवड करण्यात आली आहे. तर स्वच्छता दूत म्हाणून संजय गावडे, डॉ. राहुल पंतवालावलकर, रुजारिओ पिंटो, मेगल डिसोजा आणि महेंद्र पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली.
भारत सरकारकडून १५ सप्टेंबर ते २ आॕक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी पर्यटननगरी मालवणला पुन्हा एकदा केंद्र स्तरावर यशस्वी करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी मालवण बंदर जेटी येथे होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मालवण नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.