वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशाच्या 5 उच्च न्यायालयांमध्ये नव्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपिन सांघी यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जलभुयन यांना तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संभाजी शिवाजी शिंदे हे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमजद एहतेशाम सैयद यांना हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रश्मिन मनहारभाई छाया यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
केंद्र सररकारकडून कॉलेजियमच्या शिफारसीला मंजुरी देण्यात आल्यावर राष्ट्रपतींकडून नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे. न्यायाधीश शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठतेच्या आधारावर तिसऱया क्रमांकावर होते. न्यायाधीश अकील कुरैशी यांच्या सेवानिवृत्तीपासून राजस्थानात न्यायाधीश एम.एम. श्रीवास्तव हे प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत. परंतु न्यायाधीश शिंद हे 1 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ फार मोठा नसणार आहे.