वृत्तसंस्था/ सोनीपत
चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱया आशियाई स्पर्धा तसेच विश्वचषक आणि विश्व चॅम्पियनशीप तिरंदाजी स्पर्धांसाठी भारताची माजी टॉपसीडेड महिला तिरंदाज दीपिका कुमारीला भारतीय संघात स्थान मिळविता आले नाही. पण तब्बल एक वर्षानंतर अतानु दासने आपले या संघात पुनरागमन केले आहे.
भारताची माजी टॉपसीडेड तिरंदाजपटू दीपिका कुमारी या आगामी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी इच्छुक होती. मध्यंतरी प्रसूतीमुळे तिने काही दिवस या क्षेत्रातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात कोलकाता येथे झालेल्या निवड चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दीपिका कुमारीला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिला या निवड चाचणी स्पर्धेतील अंतिम टप्प्यातील फेरीत पहिल्या आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळविता आले नाही. ही निवड चाचणी स्पर्धा तीन दिवस चालली होती. महिलांच्या रिकर्व्ह या प्रकारात दीपिका कुमारीला भारतीय संघात स्थान मिळविता आले नाही. त्याचप्रमाणे भारताची आणखी एक महिला तिरंदाजपटू कनि÷ आणि कॅडेट विभागातील विश्वविजेती कोमालिका बारी त्याचप्रमाणे माजी राष्ट्रीय विजेती रिद्धी फोर यांनाही पहिल्या आठ तिरंदाजपटूमध्ये स्थान मिळविता आले नाही. मात्र, एक वर्षानंतर भारताचा तिरंदाजपटू अतानु दासचे संघात पुनरागमन झाले आहे. आशियाई स्पर्धा त्याचप्रमाणे चार टप्प्यात होणारी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा आणि त्यानंतरच्या विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाजी संघामध्ये आता भजन कौर, आदिती जैस्वाल, अंकिता भक्त आणि सिमरनजित कौर यांचा समावेश राहील.
भारताची माजी टॉपसीडेड तिरंदाजपटू दीपिका कुमारीचा पती अतानु दास याने गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आपला सहभाग दर्शविला नव्हता. अतानु दासने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अतेनु दासने दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग आतापर्यंत दर्शविला आहे. निवड चाचणी स्पर्धेमध्ये सेना दलाचा धीरज बी. पहिल्या स्थानावर राहिला असून अतेनु दास दुसऱया तसेच तरुणदीप रायने तिसरे आणि निरज चौहानने चौथे स्थान मिळविले आहे. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत पदक मिळविणारा भारताचा ज्ये÷ तिरंदाजपटू जयंत तालुकदार आणि इंद्रजित स्वामी यांना मात्र या निवड चाचणीमध्ये पाचव्या आणि आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
तिरंदाजीच्या कंपाऊंड या प्रकारासाठी भारताचा अव्वल तिरंदाजपटू तसेच यापूर्वी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत अनेक वेळा सुवर्णपदके मिळविणारा अभिषेक वर्मा याला मात्र पहिल्या पसंतीच्या संघामध्ये स्थान मिळविता आले नाही. 33 वर्षीय अभिषेक वर्माला निवड चाचणीमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताची महिला तिरंदाजपटू दीपिका कुमारीला अद्याप सलग चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेशासाठी आणखी एक संधी असल्याचे तिरंदाज संघटनेचे संचालक संजीव सिंग यांनी म्हटले आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुढील वषीच्या जानेवारी महिन्यात खुली निवड चाचणी स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत दीपिका कुमारीने चांगली कामगिरी केली तर ती पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल.
2023 च्या तिरंदाजी स्पर्धा कार्यक्रमाला एप्रिल महिन्यापासून प्रारंभ होत आहे. अँटेलिया येथे पहिली विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा 18 ते 23 एप्रिल दरम्यान, त्यानंतर शांघाय आणि मेडेलिन यांच्या संयुक्त यजमानपदाने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेचा दुसरा टप्पा 16 ते 21 मे दरम्यान तर तिसरा टप्पा 13 ते 18 जून दरम्यान होणार आहे. त्यानंतर विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीप स्पर्धा बर्लिनमध्ये 31 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. सदर स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीची कोटा पद्धतीकरिता चाचणीची राहील. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून चीनमधील हेंग झोयु येथे खेळविली जाणार आहे.
भारतीय तिरंदाजी संघ- रिकर्व्ह पुरुष- बोमादेवरा, अतानु दास, तरुणदीप राय, निरज चौहान, जयंता तालुकदार, इंद्रचंद स्वामी, रिकर्व्ह महिला- भजन कौर, आदिती जैस्वाल, अंकिता भक्त, सिमरनजित कौर, मधु वेदवान, संगीता, तनिषा वर्मा, प्राची सिंग, कंपाऊंड पुरुष- प्रथमेश जावकर, रजत चौहान, ओजस देवतळे, ऋषभ यादव, अभिषेक वर्मा, अमित, हर्ष बोराटे आणि कुशल दलाल.