वृत्तसंस्था/ रॉटरडॅम (हॉलंड)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात द्वितीय मानांकित अर्जेंटिनाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा सामना अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. सामन्यातील 23 व्या मिनिटाला सलीमा टेटेने भारताचे खाते उघडले. भारताचा दुसरा गोल 48 व्या मिनिटाला दीप ग्रेस एक्काने नोंदविला. अर्जेंटिनातर्फे डेलफिना थोमेने 38 व्या मिनिटाला, युगेनिया ट्रिनचिनेटीने 41 व्या मिनिटाला आणि ऑगस्टीना गोर्झेलानीने 43 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचे पुढील दोन सामने अमेरिका संघाबरोबर 21 आणि 22 जूनला होणार आहेत.