चोरट्य़ांच्या झटापटीत वॉचमन जखमी : नागरिकामध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर/दिघंची
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर रविवारी पहाटे तिघा चोरट्य़ांनी सशस्त्र लूट केली. यावेळी चोरटय़ांच्या झालेल्या झटापटीत पंपावरील वॉचमन जालिंदर बाड हे जखमी झाले. चोरटय़ांनी सुमारे 9 हजार रुपये रक्कम घेऊन पलायन केले.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिघंची येथे मायणी रस्त्यावर पेट्रोल पंप तरी रविवारी रात्री एक मोटारसायकल तेल भरण्याच्या कारणावरून आली असता येथे वॉचमन म्हणून काम करणारे जालिंदर पांडुरंग बाड (45) यांनी सेल्समन आदित्य रणदिवे यांना उठवले. सेल्समन तेल सोडायला गेल्यानंतर अन्य दोघे साथीदार पेट्रोल पंपावर आले व तोंड झाकलेल्या तिघांनी पेट्रोल पंपाच्या पैसे व तिजोरीच्या चाव्याची मागणी केली.
यावेळी चोरटय़ांनी पेट्रोल विक्रीचे नऊ हजार जबरदस्तीने काढून घेतले. चोरटय़ांजवळ सत्तूर सदृश हत्यारं असल्याने चोरट्य़ांशी झालेल्या झटापटीत वाचमन जालिंदर बाड हे जखमी झाले. झालेल्या झटापटीत त्यांच्या हात व अंगठय़ाला जखम झाली. यावेळी तिघा चोरटय़ांनी सुमारे 10 हजार रुपये घेऊन गाडीवरून मायणी रोडला एकाच गाडीवरून पलायन केले. घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांनी पोलीस गाडी गस्त घालत दिघंचीत आली असता पेट्रोल पंप कर्मचाऱयांनी त्यांना ही मिळताच सांगितली. यावेळी तात्काळ पोलिसांनी झरे रोडवर माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, चोरटय़ांचा सुगावा लागला नाही.
पेट्रोल पंपावरील चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने, आटपाडी बाजार समितीचे प्रशासक वैभव हजारे, सचिव शशिकांत जाधव, यांनी घटना स्थळी धाव घेतली. सदर घटनेची फिर्याद सेल्समन आदित्य रणदिवे यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करत आहेत.
दिघंची परिसरात मागील काही दिवसामध्ये चोऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरीला जाण्याच्या घटना देखील घडत आहेत. एकूणच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.