प्रतिनिधी / बेळगाव
एमएलआयआरसीच्या आर्मी प्रायमरी स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी ‘रेट्रो टू रोबोटिक्स’ या घोषवाक्याला अनुसरून सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून इन्फंट्रीचे कमांडन्ट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये तसेच खेळात आणि परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्या प्रचिती अंबेकर यांनी अहवाल सादर केला व शाळेच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली.