प्रतिनिधी / बेळगाव
संगीत कलाकार संघाची बैठक नववर्षाच्या पूर्वसंध्येला हार्मोनियम वादक डॉ. सुधांशू कुलकर्णी आणि त्यांचे सुपुत्र सारंग कुलकर्णी यांच्या युगल वादनाने रंगणार आहे. शनिवार दि. 31 रोजी सायंकाळी 5.30 वा. शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सहकार्याने आयोजित बैठकीत युवा गायक लक्ष्मीकांत बोंगाळे यांचेही शास्त्रीय गायन होणार आहे. कार्यक्रम सर्वांना खुला आहे.
मूळ बेळगावचे असलेले लक्ष्मीकांत हे कर्नाटक विश्वविद्यालयाचे बीए (म्युझिक) पदवीधर आहेत. किराणा-ग्वाल्हेर गायकीचा त्यांच्यावर प्रभाव असून गुऊ नंदन हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभ्यास सुरू आहे. ‘म्युझिक इन माय ब्लड’ या नाटिकेचे काव्य व संगीत दिग्दर्शन केले असून अमेरिकेत त्याचे प्रयोग झाले आहेत.
अखिल भारतीय संगीतविश्वात कुशल वादक व गुऊ म्हणून प्रख्यात डॉ. सुधांशू कुलकर्णी हे महामहोपाध्याय रामभाऊ विजापूरे यांचे ज्येष्ठ शिष्य असून हार्मोनियममध्ये अ. भा. गांधर्व महाविद्यालयाची संगीत प्रवीण पदवी त्यांना प्राप्त आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. ‘सुरमणी’ या सन्मानासह कर्नाटक संगीत नृत्य अकादमीचा राज्य पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. पित्याप्रमाणेच हार्मोनियम वादनात प्रावीण्य मिळवून उच्च दर्जाच्या संगीतकारांची साथसंगत करत सारंग कुलकर्णी यांनी आई रोहिणी यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेतले. ते एम.ए., एम.बी.ए. व संगीत विशारद पदवीधर आहेत. या कार्यक्रमामध्ये संतोष पुरी, अंगद देसाई यांची तबला साथ आणि योगेश रामदास यांची हार्मोनियम साथ लाभणार आहे.