बेळगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी सरकारने पुन्हा अशोक दुडगुंटी यांची नेमणूक केली आहे.
२०१९ आगस्ट पासून पुढील दोन महिन्यांपर्यंत महापालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळलेल्या गोकाक तालुक्यातील अंकलगी मूळचे अशोक दुडगुंटी यांना पुन्हा महानगर पालिकेच्या आयुक्तपदी जबाबदारी देण्यात आली आहे. बेळगावचे उप जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले अशोक दुडगुंटी महापालिकेचे आयुक्त असताना शहराच्या विकासासाठी अनेक ठाम निर्णय घेऊन आपला कार्यभार उत्तमरीत्या सांभाळला होता.