प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे सुपूत्र अमेय जैनोजी यांना 33 व्या वषी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टनपदी बढती मिळाली आहे. अमेय हे एनवायके (निपॉन यूसेन कुबुसीकी कैशा) शिप मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीत सेवा बजावीत आहेत.
त्यांचे शालेय शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण जीएसएस कॉलेज येथे झाले. पुढील शिक्षण तोलानी मरिटाइम्स पुणे येथे झाले. 2010 साली ते एनवायके कंपनीत नोकरीला लागले. 2012 मध्ये थर्ड इंजिनियर ऑफिसर, 2014 साली सेकंड ऑफिसर झाले. 2017 साली चीफ ऑफिसर व जून 2022 मध्ये त्यांना कॅप्टनपदी बढती मिळाली. जगभरात केवळ तीन स्पेशल शीप असलेल्या एका शीपवर ते कॅप्टन म्हणून काम पाहत आहेत. हरिहर चाळ टिळकवाडीचे रहिवासी व मराठा बँकेचे माजी शाखा मॅनेजर अशोक जैनोजी व अंजली जैनोजी यांचे ते सुपूत्र व मधुकरराव यळ्ळूरकर यांचे जावई आहेत.