प्रतिनिधी /बेळगाव
विश्व संगीत दिन व योग दिनानिमित्ताने केएलई स्कूल ऑफ म्युझिकमध्ये संगीत कार्यक्रम आयोजित केला. संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कला सादर केली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, सिनेसंगीत, नाटय़गीत, भावगीत असे विविध गायन प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. संवादिनीवर विद्यार्थ्यांनी राग बागेश्री आणि भक्तीगीत सादर केले. तबल्याच्या विद्यार्थ्यांनी ताल तीन तालमध्ये कायदा पेश केला. त्यांना संवादिनीवर यादवेंद्र पुजारी तसेच तबल्यावर जितेंद्र साबण्णावर आणि राजेंद्र भागवत यांनी साथ केली. प्रतिभा कल्लीमठ यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी केएलई स्कूल ऑफ म्यूझिकच्या प्राचार्या डॉ. स्नेहा राजुरीकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. सुनीता पाटील, डॉ. दुर्गा नाडकर्णी, को ऑर्डिनेटर डॉ. राजेंद्र भांडणकर, डॉ. अंजली जोशी, डॉ. हेमा पाटील उपस्थित होत्या.