नवी दिल्ली
हिंदुजा ग्रुप अंतर्गत येणाऱया अशोक लेलँड कंपनीने नुकतीच आपली दोन नवी वाहने बाजारामध्ये दाखल केली आहेत. व्यावसायिक वाहन बाजारामध्ये एव्हीटीआर 4220 हा 41.5 टन सरासरी वजन पेलण्याची क्षमता आणि एव्हीटीआर 4420 हा आणखी एक 43.5 टन सरासरी वजन पेलण्याची क्षमता असणारे वाहन लाँच करण्यात आले आहे. उत्तम इंधन क्षमतेसोबत अपेक्षित वजन घेऊन जाण्याची क्षमता यामध्ये असून ग्राहकांची अपेक्षा त्या पूर्ण करतील अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.