अथणी पोलीस स्थानकाचे एएसआय रामलिंग भीमाप्पा नायक यांनी आज हारुगेरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .
हारुगेरी येथील श्री बिरेश्वर मंदिराजवळ असलेल्या शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. दीर्घकाळच्या गुडघे दुखीच्या आजाराला कंटाळून त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळाली. यांच्या पश्चात पत्नी, २ मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.