पुणे / वार्ताहर :
लॅक्टोज विक्रीचा परवाना मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेब एकनाथराव देसाई असे या सहायक आयुक्ताचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीच्यावतीने लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे अर्ज केला होता. संबंधित अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी सहायक आयुक्त देसाई यांनी तक्रारदाराला 10 हजारांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून देसाई यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
अधिक वाचा : शिक्षकाकडून लाच स्वीकारताना महिला लेखाधिकाऱ्यासह दोघांना अटक