Hunger strike suspended at Sateli-Bhedshi Prof. Health Center, but dharna movement will continue
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीत आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध न केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली याच इमारतीत धरणे आंदोलनाची दिशा बदलून सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी या उपोषणाची दखल घेत काल स्थानिक आमदार व मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत २९ फेब्रुवारी पर्यंत लोकार्पण केले जाईल असे लेखी पत्र दिले .यावर आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केले असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
साटेली-भेडशी / प्रतिनिधी