गुह्याच्या विरोधात जमावाची पोलीस ठाण्यावर धडक; दलित नेत्यांविरुध्द घोषणाबाजी; पोलीस ठाणे परिसरात तणाव
इस्लामपूर प्रतिनिधी
येथील कापूसखेड रस्त्यावरील वादातील जमिनीत पुंपन घालण्यास मज्जाव केल्याने धुमाळे पुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी जातिवाचक शिवीगाळ केली. दरम्यान, संशयितांनी दोन महिलांचा विनयभंग ही केला. याप्रकरणी कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप तुकाराम पाटील यांच्यासह तिघांविरुध्द अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पाटील समर्थक व शिवसैनिकांनी पहाटेपर्यंत पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दारात ठिय्या मारुन निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
प्रदीप पाटील, शंभूराज शहाजी पाटील यांच्यासह एका अल्पवयीनवर गुन्हा नोंद केला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. कापूसखेड येथील चंद्रकांत धुमाळे यांची गट नं. 130 मध्ये शेती व घर आहे. धुमाळे यांच्या ताब्यात 50 गुंठे जमीन आहे. 30 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रदीप पाटील व अन्य आरोपी या जमिनीस मजुरांच्या मदतीने कंपाऊंड घालू लागले. त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे, अंकुश छत्रे-माने, प्रशांत नायकल, अमोल कोळी, ओंकार पाटील हे होते.
चंद्रकांत धुमाळे व कुटुंबातील लोकांनी कंपाऊंड घालण्यास मज्जाव केला. जागेच्या मालकी हक्कावरुन धुमाळे व पाटील यांच्यात वाद झाला. दरम्यान, प्रदीप पाटील याने अंगावर धावून जावून कंबरेची बंदुकसारखी वस्तू रोखून जातिवाचक शिवीगाळ केली. तर अन्य दोघांनी महिलांचा विनयभंग केला. परिसरातील लोकांनी सोडवा-सोडव केली. त्यानंतर धुमाळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ही जागेवर येवून कंपाऊंड न घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ही पाटील याने कंपाऊंड घालण्याचे काम सुऊ केले. याबाबत पोलीस ठाण्यात कागदपत्रांची शहानिशा करुन निर्णय होईपर्यंत काम थांबवण्यास सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री पाटील यांच्याविरुध्द अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला
पोलीस ठाण्यावर जमावाची धडक
पाटील समर्थक व शिवसैनिकांना गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजली. पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार हे चांगले मित्र आहेत. त्यामुळे जमावाने पोलीस ठाण्यावर धडक मारली. पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दारातच ठिय्या मारुन गुन्हा दाखल करण्यास दबाव आणणाऱ्या दलित नेत्यांविरुध्द घोषणा दिल्या. दरम्यान, पवार यांनी प्रभारी पोलीस उपाधीक्षक पद्मा कदम यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, काही दलित पुढारी आर्थिक हित संबंधातून समाजातील लोकांना हाताशी धरुन अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे नोंद करीत आहेत. त्यामुळे सवर्ण समाजातील कुटुंब उद्ध्वस्त होते आहेत. सामाजिक तेढ निर्माण होत आहे. कथाकथीत पुढारी शंकर महापूरे, विकास बल्लाळ व त्यांच्या अन्य साथीदारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
हे ठिय्या आंदोलन रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत सुऊ होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पवार, सागर मलगुंडे, अंकुश माने, प्रदीप लोहार यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान, पवार यांनी जमावापुढे आक्रमक भाषण केले. दरम्यान, इस्लामपूर पोलिसांसह उपविभागातील पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. या प्रकाराने पोलीस ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला.
ठेचून काढू
यावेळी बोलताना पवार म्हणाले, आमचे मतभेद पोलीस प्रशासनाशी नाहीत. मात्र, समाजातील गोरगरिबांना हाताशी धरुन खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती काही दलित पुढाऱ्यांची वाढली आहे. आपण सर्वांनी एक होवून ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. इथून पुढे अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरोधात आंदोलन करावेल लागेल. या भाषणा दरम्यान कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या जय घोषाबरोबरच ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.