बेळगाव : नागालँड येथे भारतीय कुस्ती फेडरेशन आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या अतुल शिरोळेने 90 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. पण दुखापतीमुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत पहिल्या लढतीत अतुलने सागरकुमार हरियाणा याचा 3-1 अशा गुणफरकाने पराभव केला. दुसऱया सामन्यात अतुलने जॉर्जी डेकॉन-आसामच्या पैलवानावर चीतपट करुन पुढील फेरीत प्रवेश केला. तिसऱया सामन्यात अतुलने नितेश तोमर-दिल्ली याचा 6-2 असा पराभव केला. उपांत्य सामन्यात अतुलने वेचितो सासा-नागालँड याचा 8-3 अशा गुणफरकाने पराभव करुन अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत विखीजो दाहो-मणिपूर याच्याबरोबर त्याने कडवी लढत झाली. यातील पहिल्या फेरीत अतुलने 3-1 तर दुसऱया फेरीत विखीजोने 6-4 अशी बाजी मारत बरोबरी साधली. तिसऱया फेरीत 4-6 असा गुणफरक असताना अतुल शिरोळेला दुखापत झाली. त्यामुळे विखीजो याला विजयी घोषित करण्यात आले. त्याला इंडियन कुस्ती फेडरेशनचे उपाध्यक्ष नीरखोलो खालो व अस्कॉन रिंगा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख 25 हजार रुपये देऊन त्याचा गौरव करण्यात आला.