मंगळवारी चार टप्पे समाप्त, अंबानी-अदानी समवेत चार गट समाविष्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
5 जी दूरसंचार स्पेक्ट्रमच्या महत्वाकांक्षी 4.3 लाख कोटी रुपयांच्या महालिलावाला मंगळवारी प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रक्रियेचे चार टप्पे पूर्ण झाले असून या लिलावात भाग घेण्यासाठी अंबानी, अदाणींसह चार मोठे उद्योगसमूह उपस्थित आहेत. याशिवाय भारती एअरटेल आणि व्होडाफोन यांचाही समावेश या लिलावात आहे. आज बुधवारी पाचवा टप्पा होणार आहे.
या लिलावात 4.3 लाख कोटी रुपये किमतीच्या 72 गीगाहर्ट्झ् स्पेक्ट्रमची विक्री होणार आहे. या स्पेक्ट्रमची वैधता 20 वर्षांची आहे. ही विक्री विविध तरंगलांबींच्या (फ्रिक्वेन्सी) स्पेक्ट्रमसाठी होणार आहे. लो फ्रिक्वेन्सी बँड, मिडियम फ्रिक्वेन्सी बँड तसेच हाय फ्रिक्वेन्सी बँड रेडिओ व्हेवज्साठी हा लिलाल होत आहे. या लिलावात यशस्वी होणाऱया कंपनीला ही सेवा पुरविण्याचा अधिकार मिळणार आहे. खरी स्पर्धा अंबानींची रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल या कंपन्यांमध्ये होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रिलायन्सची ठेव सर्वाधिक
या लिलावात भाग घेण्यासाठी कंपन्यांना काही रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागली आहे. याला प्राथमिक बोली रक्कम (बयाणा रक्कम) असेही म्हणतात. अंबानींच्या रिलायन्स उद्योगसमूहाने अदाणी उद्योगसमूहाच्या 140 पट अधिक प्राथमिक बोली ठेव दिली आहे. यावरुन रिलायन्स जिओ या लिलावासाठी किती उत्सुक आहे, हे दिसून येत आहे. रिलायन्सची प्राथमिक बोली रक्कम भारतीय एअरटेलपेक्षा अडीच पट तर व्होडाफोनपेक्षा 6.3 पट अधिक आहे. अदाणी समूहाने 100 कोटी रुपये जमा केले असून रिलायन्सने 14 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे.
रिलायन्सचे पात्रता अंक सर्वाधिक
रिलायन्सने सर्वाधिक प्राथमिक बोली रक्कम जमा केल्याने या कंपनीचे पात्रता अंकही सर्वाधिक आहेत. ते 1,59,830 इतके आहेत. चार बोलीदारांच्या सूचीत रिलायन्स प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल भारती एअरटेलचे अंक असून ते 66,330 इतके आहेत. तर व्होडाफोनचे अंक 29,370 असून अदाणी समूहाला 1,650 अंक आहेत. या अंकांवरुन त्या कंपनीची हा स्पेक्ट्रम विकत घेण्याची ‘भूक’ किती मोठी आहे याचे संकेत मिळतात, असे स्पष्ट करण्यात आले.
ड फ्रिक्वेन्सी कोणत्या...
लो फ्रिक्वेन्सी ः 600 मेगाहट्झ्, 700 मेगाहर्टझ्, 800 मेगाहर्टझ्, 900 मेगाहर्टझ्, 1800 मेगाहर्टझ्, 2300 मेगाहर्टझ्, 2500 मेगाहर्टझ्
मिडियम फ्रिक्वेन्सी ः 3300 मेगाहर्टझ्
हाय फ्रिक्वेन्सी ः 26 गीगाहर्टझ्
(या दहा बँडस्मधील 600, 700 मेगाहर्टझ्, 3.3 गीगाहर्टझ् आणि 26 गीगाहर्टझ् यांचा लिलाव आजवर कधीही झालेला नाही.)
ग्राहकाला लाभ कोणते…
ड ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा मिळणार
ड व्हिडीओ गेमिंगमध्ये मोठे परिवर्तन होणार
ड व्हिडीओ बफरिंग किंवा अडथळय़ांशिवाय
ड इंटरनेट कॉलचा आवाज स्वच्छ, सलग
ड 2 जी डाटा 10-20 सेकंदात डाऊनलोड
ड कृषीक्षेत्रात ड्रोनच्या उपयोगाला चालना
ड मेट्रो, विनाचालक गाडी चालविणे सुलभ
ड व्हर्चुअल रियालिटी, रोबो चालविणे सुलभ