गाळेधारक न्यायालयात गेल्याने 3 गाळय़ांचा लिलाव रद्द : चार गाळय़ांना थंडा प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
गणपत गल्ली व शहरातील विविध व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आयोजित केलेल्या लिलावावेळी 9 पैकी 2 दोन गाळय़ांसाठी बोली लावण्यात आली. यापैकी 2 क्रमांकाच्या गाळय़ाला मनपाने ठरविलेल्या भाडय़ापेक्षा सहा पट म्हणजेच 38 हजार रु. बोली लावली. यावेळी 2 गाळय़ांसाठी 12 बिल्डरनी भाग घेऊन बोली लावली. पण एका गाळय़ाच्या लिलावाला न्यायालयाची स्थगिती असल्याने लिलाव झाला नाही.
महापालिकेच्या विविध गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच काही गाळे नव्याने भाडेतत्त्वावर देण्यात येत आहेत. गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पण अनामत रक्कम वाढविल्याने तसेच गणपत गल्लीतील गाळय़ांबाबत न्यायालयीन वाद असल्याने गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होती. गणपत गल्लीतील गाळे बाजारपेठेच्या मध्यभागी असल्याने या परिसरातील गाळय़ांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे गर्दी होण्याची शक्मयता होती, मात्र गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने लिलावात भाग घेणाऱयांची संख्या कमी होती. गणपत गल्ली शाळा क्रमांक दोनच्या आवारातील तीन गाळय़ांपैकी एक गाळय़ाचा लिलाव करण्यास न्यायालयाची स्थगिती असल्याने बोली लावण्यात आली नाही. पण दोन गाळय़ांसाठी लिलाव करण्यात आला. एक क्रमांकाच्या गाळय़ाकरिता 6 नागरिकांनी लिलाव प्रकियेत भाग घेतला होता. 8 हजार भाडे निश्चित करण्यात आले होते. या गाळय़ांची सर्वाधिक बोली 20 हजार झाली. तर दोन क्रमांकाच्या गाळय़ासाठी पाच नागरिकांनी सहभाग घेतला होता. या गाळय़ाच्या भाडय़ाची रक्कम महापालिकेने 6400 रुपये निश्चित केली होती. पण लिलावावेळी 38 हजार बोली लावण्यात आली.
2 गाळय़ांच्या माध्यमातून वर्षाला 7 लाख महसूल
कचेरी गल्ली, चव्हाट गल्ली आणि हिंदवाडी तसेच किर्लोस्कर रोड परिसरातील 9 गाळय़ांसाठी शुक्रवारी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. पण यापैकी 2 गाळय़ांचा लिलाव झाला. किर्लोस्कर रोड येथील गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याने या गाळय़ांचा लिलाव झाला नाही. तर कचेरी गल्ली व चव्हाट गल्ली अशा विविध ठिकाणी असलेल्या गाळय़ांसाठी कोणीच सहभाग घेतला नाही. महापालिकेला 2 गाळय़ांच्या माध्यमातून वर्षाला 7 लाख रुपये महसूल मिळणार आहे. लिलाव प्रक्रियेवेळी महसूल उपायुक्त प्रशांत हणगंडी, महसूल अधिकारी सतीश अनिशेट्टर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी, बाबू माळण्णावर, सुशांत कांबळे, फारुक यड्रावी, महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णावर, देवदाणम्, आनंद पिंपरे आदींसह व कर्मचारी उपस्थित होते.