वृत्तसंस्था/ रेबाट (मोरोक्को)
येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या रेबाट डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेत सोमवारी पुरुषांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळेने दहावे स्थान मिळविले आहे.
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या 28 वर्षीय अविनाश साबळेने रेबाटमधील या स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात दहावे स्थान मिळविले. त्याने 8 मिनिटे, 17.18 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात विविध देशांच्या 18 धावपटूंनी आपला सहभाग दर्शवला होता पण केवळ 14 स्पर्धकांनी ही शर्यत पूर्ण केली. यजमान मोरोक्कोच्या विश्व आणि ऑलिम्पिक चॅम्पियन सोफेनी अल बाकेलीने 7 मिनिटे 56.68 सेकंदाचा सर्वात जलद वेळ नोंदवला. इथोपियाच्या वेलीने तर केनियाच्या अब्राहम किबीओथने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले.