प्रतिनिधी /बेळगाव
मुंबई येथील राजस्थान डिस्पेन्सरीच्यावतीने देशभरात सुरू असलेल्या आयुर्वेद डॉक्टरांचा सत्कार समारंभ बेळगाव येथेही पार पडला. कॉलेज रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये 143 आयुर्वेद डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. अडिवीश अरकेरी, डॉ. संजय होसमठ, डॉ. नागराज हलसगी आदी उपस्थित होते. डॉ. गडीहळ्ळी शेट्टी, डॉ. अरुणकुमार जमदाडे, डॉ. विनोद गुरवी आदींची कोरोना काळातील आयुर्वेद डॉक्टरांचे योगदान व त्यांनी दिलेली सेवा विशद करणारी भाषणे झाली.
धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. आरएपीएल समुहाचे अध्यक्ष डॉ. एस. डी. चोपदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रभारी अकिब सय्यद, श्रृती शेट्टी आदींसह जिल्हय़ातील आयुर्वेद डॉक्टर उपस्थित होते.