प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव येथील श्री ब्रह्मलिंग देवस्थान व कलमेश्वर देवस्थानची हनुमान जयंतीनिमित्त रविवारी गाडे यात्रा व मिरवणूक उत्साहात पार पडली. सोमवार दि. 18 रोजी सायंकाळी 6.30 वा. श्री ब्रह्मदेव मंदिरासमोर इंगळय़ाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला.
यावेळी मजगाव परिसरातील व उपनगरातील भाविक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक वाद्ये, गुलालाच्या उधळणीत संपूर्ण दिवसभर बैलजोडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. सदर यात्रोत्सवावेळी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मदल कार्यक्रम सुरू होता.
‘आज ओटी भरणे कार्यक्रम’
मंगळवार 19 रोजी श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे. यावेळी देवस्थान पंच कमिटीने आवाहन केले आहे की, फक्त पारंपरिक वाद्येच वाजवावीत. डॉल्बीला परवानगी देवू नये, असे गाव पंच कमिटीतर्फे शिवाजी पट्टण यांनी उघमबाग पोलीस स्टेशनला विनंती केली आहे.