B. in athletics competition. Success of Tanvi Dalvi and Prasad DiCholkar of Khardekar College
येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.तन्वी दिनकर दळवी हिने मुंबई येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत 5 कि.मी.चालणे या प्रकारात ब्राँझ पदक तर प्रतिक प्रसाद डिचोलकर याने उंचउडी या प्रकारात ब्राँझ पदक पटकावले.
मुंबई विद्यापीठ क्रिडा संकुल मरिन लाईन मुंबई येथे दि.14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत झोन -4 च्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन सौ. मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.देवीदास आरोलकर, प्रा.सदाशिव चुकेवाड, प्रा.एम.बी.चौगुले, प्रा. वसंतराव नंदगिरीकर, प्रा. वामन गावडे, प्रा.कमलेश कांबळे, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. मनिषा मुजुमदार आदी सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-