Asmi Manjrekar third in taluka level storytelling competition
बांदा येथील नट वाचनालयतर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत आरपीडी हायस्कुल सावंतवाडीच्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिने तृतीय क्रमांक पटकवला. अस्मि ही सहावीत शिकत आहे. थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग या विषयावर तिने कथाकथन केले होते यापूर्वी ही तिने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. अस्मिच्या या यशाबद्दल सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत, स्कुल कमिटी चेअरमन डॉ दिनेश नागवेकर, सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, मुख्यध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक श्री नाईक, पर्यवेक्षक साळगावकर, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी