तुरुंग अधिकाऱयाला धमकाविण्याचा गुन्हा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशातील बाहुबली नेता आणि माजी आमदार मुख्तार अंसारीला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली ओ. 2003 मध्ये तुरुंग अधिकारी एस.के. अवस्थी यांनी मुख्तार अंसारी विरोधात एफआयआर नेंदविला होता. तुरुंगात मुख्तारची भेट घेण्यासाठी आलेल्या लोकांची झडती घेण्याचा आदेश दिल्याने माफियाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अवस्थी यांनी केला होता. तसेच मुख्तारने शिविगाळ करत पिस्तूल रोखल्याचे अवस्थी यांनी म्हटले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयात मुख्तार अंसारी निर्दोष ठरला होता. तर राज्य सरकारने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.