जयपूर
ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म अशी ओळख असणाऱया बायजूस चालू वर्षात देशातील 200 शहरांमध्ये एकूण 500 टय़ूशन केंद्रे सुरु करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये कंपनीने आपल्या या केंद्रामध्ये आगामी दोन वर्षात जवळपास 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सदरची घोषणा ही कंपनीने जयपूर येथे पाचवे केंद्र सुरु करताना केली आहे.
आगामी काळात या योगे देशात 200 शहरांमध्ये या प्रकारे आगामी काळात जवळपास 500 केंद्रांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती बायजूस टय़ूशन केंद्राचे प्रमुख हिमांशु बजाज यांनी दिली आहे.