आपण आपल्या घरात नेहमीच (अतिशय थंडीचा काळ वगळात) अनवाणी पायांनीच चालतो. केवळ काही मोजके लोकच पायात सपाता किंवा स्लीपर्स घालतात. पण घराबाहेर जायचे असेल तर न चुकता आपण पादत्राणे उपयोगात आणतो. सहसा बाहेर आपण अनवाणी जात नाही, हे सर्वांना माहिती आहे.
तथापि, अमेरिकेच्या कनेक्टिकट नामक प्रदेशात जोसेफ डीरुओ नामक एक 39 वर्षीय व्यक्ती गेली 25 वर्षे अनवाणी चालत आहे. या कालावधीत एकदाही या व्यक्तीने कोठेही पादत्राणांचा उपयोग केलेला नाही. आपण शेवटचे पादत्राण केव्हा उपयोगात आणले होते, ते त्यांना नेमके आठवतही नाही. ऍपल कंपनीचा पहिला आयफोन 2002 मध्ये लाँच झाला होता. त्याआधी 5 वर्षांपासून आपण चप्पल बंद केली होती, एवढे त्यांना नक्की आठवते. याचाच अर्थ असा की त्यांनी किमान 25 वर्षांपासून पादत्राणे उपयोगात आणलेली नाहीत. त्यापूर्वी ते जाँगिंगचे बूट घालून पळण्याचा व्यायाम घेत असत. पण या बुटांमुळे त्यांच्या आंगठय़ांना सूज आली. हे दुखणे इतके बळावले की डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करुन घेण्याचा, किंवा बूट कधीच न उपयोगात आणण्याचा सल्ला दिला. त्यांना शस्त्रक्रिया नको होती. म्हणून त्यांनी दुसरा पर्याय निवडला. तेव्हापासून ते अनवाणीच आहेत.