क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक 17 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात सेंट पॉल्स संघाने सेंट झेवियर्स संघाचा 1-0 तर मुलीमध्ये सेंट झेवियर्स संघाने सेंट जोसेफ संघाचा 3-0 आणि 14 वर्षांखालील गटात इस्लामियाने सेंट झेवियर्स संघाचा 2-1 असा पराभव करुन बीडीएफए चषक पटकाविला.
लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने सेंट जोसेफ संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात आठव्या मिनिटाला मुजीजा आक्रम पाशाने पहिला गोल करुन आघाडी मिळवून दिली. 27 व्या मिनिटाला गोलरक्षक लक्ष्मी कांबळेने मारलेला फटक्मयावर फायदा उठवत आलिशा ब्रोजेसने दुसरा गोल केला. तर 44 व्या मिनिटाला आलिशा ब्रोजेसने तिसरा गोल करुन एकतर्फी विजय मिळवून दिला. या सामन्यात सेंट जोसेफ संघाला गोल करण्यात अपयश आले.
मुलांच्या अंतिम सामन्यात सेंट पॉल्सने सेंट झेवियर्स संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱया सत्रात 36 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या जोशवा वॉझने गोल करुन आघाडी मिळवून दिली. 40 व्या मिनिटाला झेवियर्सच्या स्पर्श देसाईने गोल करण्याची संधी दवडली. शेवटच्या दहा मिनिटात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. शेवटी हा सामना सेंट पॉल्सने 1-0 असा जिंकत अजिंक्मयपद पटकाविले.
14 वर्षांखालील प्राथमिक गटात अंतिम सामना इस्लामिया वि. सेंट झेवियर्स यांच्यात झाला. या सामन्यात आठव्या मिनिटाला इस्लामियाच्या सलमान बुखारीने पहिला गोल करुन इस्लामियाला आघाडी मिळवून दिली. 20 व्या मिनिटाला सेंट झेवियर्सच्या गौरव गोदवाणीने गोल करण्याची संधी दवडली.
दुसऱया सत्रात सेंट झेवियर्सच्या बचाव फळीतील खेळाडूच्या हाताला चेंडू लागल्याने पंचांनी इस्लामियाला पेनल्टी बहाल केली. त्यावर अबिदुल्ला किल्लेदारने अचूक गोल करीत संघाची आघाडी वाढवली. 45 व्या मिनिटाला झेवियर्सच्या गौरव गोदवाणीने गोल करुन इस्लामियाची आघाडी कमी केली. शेवटी हा सामना इस्लामियाने 2-1 असा जिंकून विजेतेपद पटकाविले.
बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे बीडीएफएचे पॅट्रॉन राम हदगल, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, रमेश गुर्जर, सचिव अमित पाटील, लेस्टर डिसोजा, एस. एस. नरगोडी, रवी चौगुले, सेंट पॉल्सचे उपप्राचार्य सॅबॅस्टीन परेरा, सुनील गोदवाणी, इस्लामियाचे मुख्याध्यापक बशीर सावनूर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स, इस्लामिया व सेंट झेवियर्स तर उपविजेत्या सेंट झेवियर्स व सेंट जोसेफ संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिषेक चेरेकर, शुभम झेंडे, गौरव बांदेकर, जीवन रॉड्रीक्स यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पोर्टिंग प्लॅनेटचे मतीन इनामदार व त्यांच्या साथीदारांनी विशेष परिश्रम घेतले.