स्वतःच्या पैशांनी घडविली कर्मचाऱयांची लक्झरी ट्रिप
कोरोना काळात जगभरातील कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होमचे प्रचलन सुरू होते. त्यानंतर हळूहळू कोरोना संकट निवळू लागताच लोक हिंडू-फिरू लागले. याचदरम्यान अनेक कंपन्यांनीही स्वतःच्या कर्मचाऱयांसाठी मनाचा मोठेपणा दाखविला. असेच एक प्रकरण ऑस्ट्रेलियातील एका कंपनीतून समोर आले. येथील एका मार्केटिंग कंपनीच्या बॉसने स्वतःच्या कर्मचाऱयांना करविलेली ट्रिप पाहता सर्वजण त्याचे फॅन झाले आहेत.
सिडनी शहरातील एका मार्केटिंग कंपनीच्या बॉसने स्वतःच्या कर्मचाऱयांसाठी इंडोनेशियातील बाली येथील ट्रिपची व्यवस्था स्वतःच्या पैशांनी केली. एवढेच नव्हे तर सुमारे दोन आठवडय़ांपर्यंत चाललेल्या या ट्रिपमध्ये कर्मचाऱयांनी मोठय़ा प्रमाणात मौजमस्ती केली, परंतु काही कर्मचारी यादरम्यान स्वतःच्या लॅपटॉपमध्ये बिझी देखील दिसून आले. कर्मचाऱयांनीच या ट्रिपची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
या ट्रिपदरम्यान लक्झरी हॉटेल, उत्तम जेवण, योग आणि सकाळचे हिंडणे सामील राहिले. काही कर्मचाऱयांनी स्वीमिंग पूलमध्ये उतरून मजा केली आहे. लांब पायी प्रवास, क्वाड-बाइकिंग आणि योग अभ्यास करण्यासारख्या मजेशीर कृती या ट्रिपच्या विशेष गोष्टींपैकी एक राहिल्या आहेत. ही एक परस्परांसोबत वेळ घालविण्याची उत्तम पद्धत होती असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने म्हटले आहे.
कोरोना काळाने काम करण्याच्या नव्या पद्धती असून आम्ही कुठूनही काम करू शकतो हे शिकविले आहे. याचमुळे आम्ही प्रत्यक्षाला याला पुढी स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. या ट्रिपने विविध विभागांच्या सहकाऱयांना पहिल्यांदाच वैयक्तिक स्वरुपात भेटण्याचा आणि एकत्र काम करण्याची संधी प्रदान केल्याचे व्यवस्थापकीय संचालकाने सांगितले.
पूर्ण एजेन्सीसोबत काम करणे, संभाषण अन् सहकार्य करण्यासाठी हा एक उत्तम अनुभव होता. निश्चितपणे हा न विसरता येणारा अनुभव असल्याचे एका विभागप्रमुखाने म्हटले आहे. सध्या ही टीप इंडोनेशियाच्या बालीमधून परतली आहे. कर्मचारी स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर याची छायाचित्रे पोस्ट करत आहेत.