चिकोडी-एकसंबा मार्गावर नणदी क्रॉस येथे रविवारी रात्रीची घटना
वार्ताहर /एकसंबा
एकसंबाहून बेळगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो दुचाकीसह पाणी साचलेल्या ख•dयात पडला. यामध्ये तो जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री चिकोडी-एकसंबा मार्गावर नणदी क्रॉस येथे घडली. नितीन दीपक केसरकर (वय 35, रा. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.
नितीन हा एकसंबा येथे आपल्या पाहुण्यांकडे आला होता. रात्री उशिराने तो बेळगावला आपल्या दुचाकीवरून जात असताना नणदी क्रॉसजवळ रस्त्यावर असलेल्या वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो दुचाकीसह जाऊन ख•dयात पडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी कळविल्यानंतर सदलगा पोलिसांनी येऊन पंचनामा केला.