मिनी ऑलिम्पिक हॉकी स्पर्धा : हासन संघाला विजेतेपद : दक्षिण कन्नडाला तिसरे स्थान
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे युवजन क्रीडा खाते व मिनी ऑलिम्पिक कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षाखालील मुलींच्या साखळी हॉकी स्पर्धेत बेळगाव जिल्हा मुलींच्या संघाने 8 गुण घेत उपविजेतेपदासह रौप्यपदक पटकाविले. तर 10 गुणांसह हासन संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. बेळगाव संघाने पुन्हा हॉकीमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे.
बेंगळूर येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील हॉकी स्पर्धेत बेळगाव जिल्हा मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात धारवाड संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात मायव्वा व वैष्णवी यांनी प्रत्येकी 2 गोल तर हर्षाने 1 गोल केला.
दुसऱया सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने कोडगू संघाचा 4-2, तिसऱया सामन्यात दक्षिण कन्नडा संघाचा 14-1 तर चौथ्या सामन्यात बळ्ळारी संघाचा 11-0 असा धुव्वा उडवित 8 गुण मिळविले. पण शेवटच्या सामन्यात बलाढय़ हासन संघाने बेळगाव जिल्हा संघाचा 6-0 असा पराभव केला. त्यामुळे गुणतालिकेत हासन 10 गुणांसह प्रथम, 8 गुणांसह बेळगाव जिल्हा दुसऱया, 6 गुणांसह दक्षिण कन्नडा संघ तिसऱया क्रमांकावर राहिला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या हासन, उपविजेता बेळगाव व तिसऱया क्रमांकावर राहिलेल्या दक्षिण कन्नडा संघाला चषक, प्रमाणपत्र, पदके देवून गौरविण्यात आले. बेळगाव जिल्हा संघाला प्रशिक्षक म्हणून ज्येष्ठ हॉकीपटू सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, साकिब बेपारी, सचिन पवार व प्राजक्ता निलजकर यांचे मार्गदर्शन लाभले.