वार्ताहर /कणकुंबी
लोककल्प फौंडेशन आणि स्टेट बँक ऑफ मोरीशियस यांच्या सौजन्याने आमगाव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला प्रजासत्ताक दिनी बेंचचे वितरण करण्यात आले. यावेळी लोककल्प फौंडेशनचे संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्यचे चेअरमन अजित गरगट्टी तसेच पॅप्टन नितीन धोंड, संचालक किरण गावडे, सी.एस.आर. मॅनेजर मालिनी बाली यांच्यासह लोककल्प फौंडेशनचे कार्यकर्ते संतोष कदम, अनंत गावडे, सूरजसिंग रजपूत, प्रीतेश पोतेकर, सुहासिनी पेडणेकर यांनी आमगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दहा बेंचचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक बाळेकुंद्री तसेच जांबोटी सबपोलीस स्टेशनचे एस. एस. आय. बडीगेर व पोलीस कॉन्स्टेबल तळवार, शाळा सुधारणा कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी लोककल्प फैंडेशनच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.