न्हावेली / वार्ताहर
श्री देव भूतनाथ कलाक्रिडा मंडळ,निरवडे आयोजित भूतनाथ मंदिरात सोमवार २८ ॲागस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून नवोदित भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत निवडक दहा भजन संघांचा सहभाग आहे.सांयकाळी ६.वाजता जय भवानी भजन मंडळ,तळवडे बादेवाडी ( बुवा- वेदिका मोर्ये )सायंकाळी ६.४० वाजता श्री क्षेत्रपालेश्वर भजन मंडळ,होडावडा ( बुवा- दत्तप्रसाद गुळेकर ) सायंकाळी ७.२० वाजता श्री नवतरुण भजन मंडळ,ओटवणे ( बुवा- आत्माराम कवठणकर ) रात्री ८ वाजता श्री गणेश भजन मंडळ,माजगाव ( बुवा – कृणाल वारंग )रात्री ८.४० वाजता ईसवटी पंचदेवी भजन मंडळ,न्हावेली ( बुवा- सुरज पार्सेकर) रात्री ९.२० वाजता श्री कलेश्वर पूर्वीदेवी भजन मंडळ,वेत्ये ( बुवा- प्रथमेश निगुडकर) रात्री १०.१५ वाजता श्री सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ,तळवडे ( बुवा- काशिनाथ परब ) रात्री १०.५५ वाजता श्री देवी सातेरी भजन मंडळ,मांतोड ( बुवा- विशाल घोगळे ) रात्री ११.३५ वाजता स्वरसाधना भजन मंडळ,कडावल ( बुवा- मयुर सुर्वे ) रात्री १२.१० वाजता विठ्ठल रखुमाई भजन मंडळ,आंदुर्ले ( बुवा – अर्थव होडावडेकर ) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ द्वितीय ३००१ तृतीय २००१ उत्तेजनार्थ १००१ वैयक्तिक पारितोषिके उकृष्ट गायक ५०१ उकृष्ट हार्मोनियम ५०१ उकृष्ट पखवाजवादक ५०१ उकृष्ट तबलावादक ५०१ उकृष्ट झांजवादक ५०१ उकृष्ट कोरस १००१ शिस्तबद्ध संघ १००१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. इतर सहभागी सर्व भजन संघाना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तरी भजनप्रेमी ग्रामस्थ तसेच सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भूतनाथ कलाक्रिडा मंडळाने केले आहे.