प्रतिनिधी / बेळगाव
येथील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या नूतन अध्यक्ष म्हणून भाविकाराणी होनगेकर यांची 2023-25 पर्यंतच्या कालावधीसाठी एकमताने निवड करण्यात आली. त्या 15 वर्षांपासून बँकेच्या संचालक मंडळामध्ये आहेत.अन्य संचालक मंडळ पुढीलप्रमाणे-नीला पाटील, साक्षी चोळेकर, मंगल नाईक, लता खांडेकर, भारती किल्लेकर, बेबीताई पाटील, सुश्मिता पाटील, शशिकला काकतकर, श्वेता घाटगे. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक गोविंदगौडा पाटील यांनी काम पाहिले. बँकेचे व्यवस्थापक नितीन आनंदाचे व संचालक मंडळाने अध्यक्षांचे अभिनंदन केले.