प्रतिनिधी / म्हापसा
आझादी का अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हापशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती म्हापशाचे आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यानिमित्त 10 ऑगस्ट रोजी भाजप महिला मोर्चातर्फे प्रभात फेरीचे आयोजन केले होते. 11 रोजी 5.30 वा. भाजप मंडळतर्फे मशाल यात्रा मिरवणुकीचे आयोजन केले. म्हापसा मुख्य गेटवर मिरवणुकीची सुरुवात झाली. 12 ऑगस्ट रोजी भाजपा युवा मोर्चा व म्हापसा मंडळ आयोजित बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात करासवाडा जंक्शन येथे सुरू होऊन तार पुलावर याची सांगता होणार आहे.
13 ऑगस्ट रोजी भाजपा मंडळतर्फे दु. 12 वा. भाजप उत्तर गोवा कार्यालयाजवळ खोर्ली म्हापसा येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उपसभापतीच्याहस्ते ध्वजारोहण झाल्यावर सर्वत्र घरोघरी तिरंग्याचे वाटप करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपसभापतीनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला मंडळ अध्यक्ष सुशांत हरमलकर, सचिव योगेश खेडेकर, यशवंत गवंडळकर, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, नगरसेविका बाबरा कारास्को, प्रिया मिशाळ, किशोरी कोरगावकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, साईनाथ राऊळ, स्वप्नील शिरोडकर, विराज फडके, तन्वेश केणी, महिला मोर्चा अध्यक्षा रोशन नाईक उपस्थित होत्या.