रत्नागिरीतील कारागृहातील सावरकरांच्या कोठडीला दिली भेट; वरिष्ठांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले
रत्नागिरी प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातील कोठडी पाहिली की, त्यांनी देशासाठी केलेला त्याग, बलिदान यांची आठवण होत़े दोन वर्ष त्यांचे वास्तव्य असलेल्या कोठडीला भेट देवून मी आज त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. सावरकरांचा देशाबद्दल असलेला अभिमान, देशप्रेम हे सर्वांसाठीच प्रेरणादायी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल़े. आझादी का अमृत महोत्सव निमित्त शुक्रवारी केंद्रीय सुक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला भेट दिल़ी यावेळी पत्रकारांशी राणे बोलत होते.
नारायण राणे यांच्या कारागृह भेटीवेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ड़ॉ ब़ी
एऩ पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ड़ॉ इंदुराणी जाखड,
जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग, रत्नागिरी कारागृह अधीक्षक
रामराजे चांदणे, इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होत़े