नवी दिल्ली
एम. पी. बिर्ला ग्रुपची कंपनी बिर्ला कॉर्पोरेशन आगामी काळात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. पुढील आठ वर्षात टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार असून सिमेंट उत्पादनात वाढीचा निर्णय घेतला आहे. सिमेंट उत्पादन क्षमता 30 दशलक्ष टन इतकी करण्याचा मानस कंपनीचा असून सध्या ही क्षमता 20 दशलक्ष टन इतकी आहे. महाराष्ट्रात मुक्तबनजवळ एक प्रकल्प सुरू करायचा कंपनीचा विचार असल्याचे सांगण्यात येते. एकंदर उत्पादन क्षमता वाढविण्यावर आगामी काळात कंपनीचा भर असेल.