चंदीगड / वृत्तसंस्था
पुढील महिन्यात होणाऱया आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने सतेंदर सिंग यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ये÷ नेते सुशील गुप्ता यांनी शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यापूर्वी भाजपसोबत असलेले सतेंदर सिंग यांनी गेल्या महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत हिस्सारमध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी आप पक्षाच्या विचारसरणीने प्रभावित झाल्याचे आणि आदमपूरच्या विकासासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यांच्या या वक्तव्यापासूनच त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत व्यक्त होऊ लागले होते.
कुलदीप बिष्णोई यांनी काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिल्यामुळे आदमपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. बिष्णोई यांनी 4 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ‘आप’ हा उमेदवार जाहीर करणारा प्रमुख पक्षांपैकी पहिला पक्ष आहे.