नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशात भाजपला मंगळवारी मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खिमी राम शर्मा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱया पक्षात सामील झाल्याचा गर्व असल्याचे उद्गार शर्मा यांनी काढले आहेत. शर्मा हे राज्याचे माजी मंत्री तसेच विधानसभा उपाध्यक्ष राहिले आहेत. भाजपबद्दल संताप असल्याने काँग्रेसमध्ये सामील होत नसून हिमाचल प्रदेशात काँग्रेसला नवी उंची गाठून देण्यासाठी हा विचारपूर्वक निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.
…………………………………………………………………………………………………