भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामुळे राज्य़ात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ऑडियो क्लीपमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांला पत्रकारांना खुष ठेवण्यासाठी चहाला घेऊन जाण्यासाठी सुचना देत असून त्यांच्य़ा चहाचा अर्थ कार्यकर्त्याला समजाऊन सांगत आहेत. पत्रकारांना चहाबरोबरच धाब्यावर जेवणासाठी नेण्याच्याही सुचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाववकुळे यांनी दिल्या आहेत.
आज आमदार अपात्रतेवरून सुनावणी सुरु असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन बाववकुळे यांच्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बावनकुळे यांची एक ऑडियो क्लीप चांगलीच व्हायरल झाली असून त्यांनी फोनवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकिय क्षेत्रात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (२४ ऑगस्ट) अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं.
या बैठकीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशुन केलेल्या भाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की “पत्रकारांनी २०२४ पर्यंत भाजपाविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायलाही घेऊन जा.” असे त्यांनी म्हटले आहे.