रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला व तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित दिनेश कुमार ओमप्रकाश ( 27 वर्षे, रा. छर्पिया, पोस्ट महुवार, रुर्धेली खुर्द, जि. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश) यास 24 सप्टेंबर 2023 रोजी मडगाव, गोवा राज्यातून अटक करण्यात आली आहे.
आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे, तसेच त्याच्या कडून 39200 रुपये किंमतीचे 04 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत रेल्वे प्रवासा दरम्याने चोरीच्या गुन्ह्यांमधील आतापर्यंत एकूण 66,699/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने रेल्वे प्रवासा दरम्यान आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, पोलीस हवालदार सागर साळवी, पोलीस हवालदार, योगेश नार्वेकर, पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.