खानापूर : नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावांमधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे. नंदगड, हलशी परिसरातील गावांमध्ये जाऊन भाजपचा प्रचार सुरू केला आहे. यामुळे मतदारांत जागरूकता निर्माण झाली आहे. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या ंसंख्येने जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मोदी आणि कर्नाटक सरकारने गेल्या काही वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती देवून तालुक्यात भाजपचा उमेदवार निवडून आल्यास तालुक्यातील विकास निश्चित होणार आहे. यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रातील बस्तवाड, मेरडा, करजगी, किरहलशी, हत्तरवाड, हलगा आदी गावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचार केला. तसेच घरोघरी जावून मतदारांना मतपत्रिकेचे वितरण करून मतदान करण्यांसदर्भात माहिती दिली. व बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
Previous Articleहुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका
Next Article काँग्रेसकडून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.