खानापूर : खानापूर तालुका भाजपने आपल्या जाहीर प्रचाराला मंगळवारी सकाळी सुऊवात केली. सकाळी 11 वाजता गांधीनगर येथील भाजप संपर्क कार्यालयासमोरून दुचाकी रॅलीला सुऊवात करण्यात आली. यावेळी प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार वाहनाचे पूजन विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रभारी उज्ज्वला बडवाण्णाचे, सुलक्षणा सावंत, सुरेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सुलक्षणा सावंत यांनी दुचाकी रॅलीला ध्वज दाखवून चालना दिली. या रॅलीत उमेदवार विठ्ठल हलगेकर दुचाकीवर स्वार झाले होते. यात किरण येळळूरकर, सुरेश देसाई, बाबुराव देसाई, आप्पय्या कोडोळी, मल्लाप्पा मारिहाळ, वसंत देसाई, भाऊराव पाटील, दिलीप सोनटक्के यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीला गांधीनगर येथून सुरुवात झाल्यानंतर गणेबैल, इदलहोंड, गर्लगुंजी, देवलत्ती, पारिश्वाड, बेकवाड, मुगळीहाळ येथून बिडी येथे रॅलीची सांगता झाली. या ठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सभेत ही रॅली सहभागी झाली.
Previous Articleस्वस्तिक मोरेचे कुस्ती स्पर्धेत यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.