मुस्लीम लीगची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी ः हिंदू देवी-देवतांशी कमळाच्या फुलाचा संबंध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंडियन मुस्लीम लीगने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत धर्माशी निगडित निवडणूक चिन्हांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या देवी-देवतांचा संबंध कमळाच्या फुलाशी आहे, याचमुळे भाजपच्या निवडणूक चिन्हावर बंदी घातली जावी असे मुस्लीम लीगने म्हटले आहे. राजकीय पक्षांना धार्मिक नावे आणि प्रतीकांच्या वापरापासून रोखण्यासाठी भाजपला याप्रकरणी प्रतिवादी करण्यात यावे अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
न्यायाधीश एम. आर. शाह आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर मुस्लीम लीगच्या याचिकेवर सुनावणी झाली. मुस्लीम लीगचे वकील दुष्यंत दवे यांनी भाजपसमवेत 26 पक्षांचे निवडणूक चिन्ह हे धार्मिक असल्याने त्यांना प्रतिवादी करण्यात यावे असे म्हटले आहे. या राजकीय पक्षांमध्ये शिवसेना, हिंदू सेना, हिंदू महासभा, ख्रिस्तियन डेमोक्रेटिक प्रंट, शिरोमणी अकाली दल आणि इस्लाम पार्टी सामील असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांमध्ये कमळाला धार्मिक महत्त्व असल्याचा त्यांनी केला आहे.
भारताचे माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील के. के. वेणुगोपाल यांना यप्रकरणी याचिकेच्या विरोधात एआयएमआयएमची बाजू मांडली आहे. त्यांनी या याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचिका दाखल करणाऱया पक्षाच्या कुठल्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत नसल्याने ही याचिका फेटाळली जावी. याच्याशी निगडित एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.